संजय नागावकर यांना मुंबई विद्यापीठाकडून शिक्षणशात्रात पीएच डी प्रदान

डोंबिवली :  संजय नागावकर आटगाव विद्यामंदिर कानिष्ठ महाविद्यालय कोन, भिवंडी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.अत्यंत प्रतिकूल परिस्थितून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेले आहे. वडील लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे त्यांच्या आईचे व पत्नीचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. भिवंडी तालुक्यातील पिंपळास येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.अत्यंत मेहनती, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यामुळे यापूर्वी त्याना अनेक मानाच्या उत्कृष्ट पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या डोंबिवलीतील गणेश एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. तेथील जुनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना गणिताचे मार्गदर्शन करतात.गेले पंचवीस वर्षे अध्यापनाचे कार्य करीत असतानाच त्यांनी M. Sc., M. Ed. DSM, CPCT, DGVD इ. पदव्या मिळविल्या डोंबिवलीतील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्या असलेल्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून चालविण्यात येणऱ्या य. च. म.मुक्त विद्यापीठाच्या त्यांनी M.Sc. व  DSM    या पदव्या प्राप्त केल्यानंतर डॉ नागराज राव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संजय नागावकर यांना मुंबई विद्यापीठाकडून नुकतीच डॉक्टरेट (Ph.D.) पदवी जाहीर करण्यात आली. आज DSM च्या वर्गात  जेष्ठ प्राध्यापक व थोर शिक्षणतज्ज्ञ तसेच सेवा सदन शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून उप प्राचार्य या पदावरून निवृत्त झालेले डॉ शरद धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व एस एन डी टी महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ सुभाष वाघमारे तसेच गणेश विद्यामंदिर टिटवाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री. विवेक पुराणिक सर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट