मसजिद बंदर मध्ये जुन्या जिर्ण इमारतीत बेकायदा लिफ्टला परवानगीचा गौडबंगाल

मुंबई उदवाहन नियम १९५८ नियम ४ (२) च्या नियमाचे उल्लघन

मुंबई दि,२६ ( विशेष प्रतिनिधी) मुंबईत अनेक घटना रोज घडत असतात काही चांगल्या काही वाईट तशीच घटना आहे. मसजिद बंदर हा एक बहुल व्यावसायिक हब असून. येथील जागेचा भाव हा गगनाला भिडला आहे येथील बहुतेक इमारती   (पागडी)भाडेपट्याच्या असून  या इमारतींना मालक अस्तीत्वात आहे. तो मालक म्हणजे एक हुकुमशाह त्याला हिटलर म्हणले तरी हरकत नाही. मसजिद बंदर विभागात अनेक इमारती इंग्रज कालीन असून काही इमारती तर मोडकळीस आल्या आहेत तर काही इमारती तग धरून विकास होईल या आशेने उभ्या आहेत. मसजिद बंदर विभागात विकास फक्त  मालकाचा होताना दिसत आहे

अशीच एक जुनी जिर्ण इमारत ४२ काझी सैय्यद स्ट्रीट गमंत बघा ७०० ते ८०० स्वे.फूटाची इमारत तिला धड नीट दादर  (स्टेअर केस) पण नाही गरज नसताना त्या इमारतीला काही दिवसापूर्वी  उदवाहन (लिफ्ट) बसवण्याचे काम करण्यात आले. सूत्राच्या माहीती नुसार या लिफ्टला उद्योग उर्जा व कामगार  विभागाची मुंबई उदवाहन नियम १९५८ च्या नियम ४ (२) च्या नियमा अंतर्गत परवानगी मिळाल्या नंतर अग्निशमक दलाची N.O.C मिळावी लागते. परवानगी मिळाली नसताना उदवाहन (लिफ्ट) चा इमारत मालकानी  नियम धाब्यावर बसवून बसवली असून आता महापालिका बी विभाग या बेकायदा उदवाहन (लिफ्ट) वर कारवाई  करतील का हा यक्ष प्रश्न आहे.

महापालिका बी विभागातील कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी बेकायदा असेल नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले

विशाल साखळकर -                      इमारत व कारखाने विभाग



संबंधित पोस्ट