रक्षाबंधन सणानिमित्त चिपळूण व महाडमधील पूरग्रस्तांना गृहपयोगी वस्तूंची भेट
- by Reporter
- Aug 26, 2021
- 1348 views
महाड : महापुराने घातलेल्या तांडवाने कोकणातील विशेषतः महाड व चिपळूण या भागातील जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले होते. यात नागरिकांचे प्रचंड हाल तर झालेच परंतु वित्तहानी व जीवितहानी देखील झाली.
अश्या परिस्थितीत समाजातील सर्व स्तरातील लोकांनी कर्तव्य भावनेने या कुटुंबियांच्या मागे उभे राहून आपले सामाजिक उत्तरदायित्व दाखवून दिले होते, अगदी याच जाणिवेतुन पालकमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख मा. श्री. गोपाळजी लांडगे, उपजिल्हाप्रमुख मा. श्री. चंद्रकांतजी बोडारे, खासदार डाॅ. श्रीकांतजी शिंदे, आमदार डाॅ. बालाजी किणिकर, शहरप्रमुख मा. श्री. अरविंदजी वाळेकर व महिला जिल्हा संघटक मा. सौ. विजयाताई पोटे उपजिल्हा संघटक मा.सौ. अंजलीताई राऊत, अंबरनाथ शहर संघटक मा.सौ. मालतीताई पवार यांच्या आदेशानुसार प्रभाग क्र. ३७ च्या मा. नगरसेविका सौ. रेश्मा अजित काळे उपशहर प्रमुख श्री. संजय हरी सावंत व शाखा प्रमुख श्री. अरविंद मारुती निकम व शाखा प्रमुख श्री. संतोष जंगम यांच्या विशेष प्रयत्नातून छोटासा खारीचा वाटा उचलला गेला. यात पुरग्रस्त 230 कुटूंबातील माता भगिनींसाठी रक्षाबंधन सणानिमित्त गृहपयोगी वस्तू, साडी-चोळी, ब्लॅकेटस व मिठाईचे वाटप* करण्यात आले.
ग्रामपंचायत बिरवाडी, गणेश नगर,ता. महाड, जिल्हा. रायगडच्या ग्राम पंचायत सदस्या सौ.उर्मिला उत्तम खेडेकर व शाखाप्रमुख श्री. संदीप पवार यांच्या सहकार्यातून, तसेच ग्रामपंचायत दळवटणे,बागवाडी, ता. चिपळुण, जिल्हा रत्नागिरी येथील बाबाराव महाडीक व उपशाखा प्रमुख श्री. विजय महाडीक, श्री. अजित काळे ,समाजसेवक श्री.कैलाश फलके, श्री.अशोक सावंत, श्री. गणेश शेट्टे, सागर सांलुखे, रोहन दरेकर व श्री. प्रदीप गोलतकर यांनी 230 कुटुंबियां साठी लागणारे गृहपयोगी साहित्य वाटप करून पूरग्रस्त महिला भगिनींना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे अश्वस्त करण्याचा छोटासा व हातभार लावण्याचा प्रयत्न केला...
रिपोर्टर