डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनची पूरग्रस्तांना मदत


महाड (प्रतिनिधी):  महाड तालुक्यात आलेल्या महापुरात नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया मुंबई जिल्हा कमिटीच्या युवकांनी तालुक्यासह चिपळूण येथे जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले . नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून, त्यातून जनजीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी पूरग्रस्त नागरिकांना आधार देण्याचे काम सामाजिक संस्थांनी केले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनने मदतीचे किट वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी राखली . दासगाव , वहूर , रायगडवाडी, शेल आदिवासीवाडी, पोलादपूर शहर, पंचशीलनगर या भागात अन्नधान्य किटचे वितरण करण्यात आले . यावेळी कॉ . सुबोध मोरे , म्हाडा पत्रकार संघ अध्यक्ष दीपक पवार, संतोष ठाकूर, फेडरेशनचे अध्यक्ष
अ‍ॅड. प्रदीप साळवी, सचिव महेंद्र उघडे, कोषाध्यक्ष बाळू पंडागळे , उपाध्यक्ष राहुल अमीन, संजीव शामंतुल, राजेश सुरडकर, संजय कांबळे, रत्ना वाघमारे , शेखर शंकरन , लक्ष्मी शामंतुल यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दीपक पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोकणावर आलेल्या आपत्तीने आम्ही व्यथित झालो असून, या नुकसानीची भरपाई भरून न निघणारी असल्याचे सांगितले. मात्र यातून कोकणातील माणसाने सावरून पुन्हा नव्या जोमाने उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले. तर अ‍ॅ.साळवी यांनी या आपत्तीने आपल्याला बरेच काही शिकवले असून, कोकणातील तरुणांनी शिक्षणाबरोबर आपल्या न्याय हक्कांसाठी आवाज उठविण्याचे आवाहन केले .



रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट