गुहागर साखरी आगर क्रिकेट स्पर्धेत प्रतिक इलेव्हन संघाने मारली बाजी

गुहागर,( निलेश मोरे) गुहागर तालुक्यात साखरी आगर येथे खेळवण्यात आलेल्या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत प्रतीक इलेव्हन या संघाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले तर द्वितीय पारितोषिक भूमी इलेव्हन संघाला मिळाले. प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला आकर्षक चषक व रूपये 15000 हजार देऊन सन्मानित करण्यात आले तर द्वितीय पारितोषिक विजेत्या संघाला चषक व रुपये 10000 हजार देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तर रत्नागिरी जिल्हा भाजपाचे क्रीडा आणि सांस्कृतिक अध्यक्ष जयेशदादा वेल्हाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यातील 35 संघ खेळवण्यात आले. अंतिम सामन्यात मालिकावीर निकेश जाधव , सामनावीर राजेश धनावडे , फलंदाज प्रणित पालशेतकर गोलंदाज कुंदन रोहिलकर , क्षेत्ररक्षक सुशांत रोहिलकर यांना देण्यात आले. क्रीडा आणि सांस्कृतिक अध्यक्ष असलेले जयेशदादा वेल्हाळ हे आंतराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक आहेत. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक गोल्ड मेडल मिळवले आहेत. गुहागर तालुक्यातील किंबहुना राज्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील मुलांनी विविध खेळाकडे लक्ष केंद्रित करून सहभाग घेऊन एक स्पर्धक बनून देशासाठी खेळले पाहिजे असे विजेत्या संघाला पारितोषिक देताना क्रीडा व सांस्कृतिक अध्यक्ष जयेशदादा वेल्हाळ यांनी मार्गदर्शन केले.

संबंधित पोस्ट