न्यू पनवेल क्रिकेट अकॅडेमी एकेडेमीचे उदघाटन

पनवेल : मैदानी खेळ तन आणि मन प्रसन्न ठेवत असतात. आरोग्याचे जतन करत असतात. त्यात क्रिकेटसारखा खेळ योग्य तंत्र आणि मार्गदर्शनाखाली शिकल्यास खेळाडू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले नाव कोरू शकतो. ह्याच जाणिवेतून सरकारी वसाहतीचे सदस्य राजन जोशी, शेखर सावंत आणि अकॅडेमी बनविण्यासाठी मेहनत घेतलेले प्रशिक्षक सुहास हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये "न्यू पनवेल क्रिकेट अकॅडेमी एकेडेमी"चे उदघाटन करण्यात आले. 

याप्रसंगी सुरेश म्हात्रे, राजेश शिंदे आणि सचिन हिरवे तसेच अकॅडेमीचे सर्व खेळाडू तसेच रायगड जिल्ह्याचा १९ वर्षाखालील संघाचे राज्याचे प्रतिनिधित्व करणारा आदित्य कदम उपस्थित होता.

ह्या एकडेमी मध्ये २ पिच असून प्रशस्त  मैदान उपलब्ध झाले त्याबद्दल खेळाडूंनी प्रशिक्षक सुहास हिरवे यांचे आभार मानले व अभिनंदन केले.

नवीन पनवेल किंवा पनवेल मध्ये असे नेट क्रिकेट सराव पिच नसताना हिरवे सरांनी हा एक आदर्श घालून दिला हे वाखानण्याजोगे आहे, असे मत यावेळी राजन जोशी आणि शेखर सावंत यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सरकारी कर्मचारी वसाहती मधील रहिवासी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट