विदर्भ-मराठवाडा विकास निधीची साठमारी करणाऱ्याला विदर्भाचा दर्भ दाखविणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. १७ (श्रीकांत जाधव) :विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेसाठी वैद्यनिक विकास महामंडळ संविधानिक कवचकुंडल आहे. या अर्थसंकल्पीय विकास निधीवर कोणाचा तरी डोळा आहे. विदर्भ मराठवाड्याच्या जनतेच्या या निधीची साठमारी करणाऱ्या शुक्राचार्याला विदर्भाची जनता विदर्भाचा दर्भ दाखविल्या शिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा भाजपाचे नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला. 

वैद्यनिक विकास महामंडळाला मुदतवाढ मिळावी, म्हणून सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र घेऊन लढा उभारणार असल्याचे ही त्यांनी सांगितले. मात्र, मंडळासाठी न्यायालयात जाण्याची आवश्यकता नसून विधानसभेत जोरदार आवाज उठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

विदर्भ आणि मराठवाडा वैद्यनिक विकास महामंडळाच्या मुद्दत वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात असताना देखील त्यावर सरकार सकारत्मक विचार करीत नाही. केवळ प्रस्तावाचा विचार करीत आहे. हा निधी नाकारून आमच्या जनतेचा अपमान होणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी. अन्यथा त्याचे परिणाम आगामी अर्थसंकल्प मांडताना होतील. सत्ताधारी पक्षातील काही मंत्री देखील त्यासाठी आग्रही आहेत. त्याप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भातील काही इतर पक्षीय आमदार आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट