
माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीचा द्रष्टा पाठीराखा आणि लोकशाहीचा जागता पहारेकरी हरवला.
भीम आर्मी राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांनी भीम आर्मीच्या वतीने वाहिली आदरांजली.
- by Reporter
- Feb 15, 2021
- 1061 views
मुंबई (प्रतिनिधी)पुरोगामी विचारांची दीप तेवत ठेवणारे दीपस्तंभ , लोकशाही संवेदनांचा जागता पहारेकरी बनून संवैधानिक विचारांचा प्रकाश उजळत ठेवणारे , कुणाचीही भीडभाड न ठेवता आपली स्पष्ट मते मांडत असंख्य महत्वपूर्ण खटल्यांचे दूरगामी परिणाम साधणारे ऐतिहासिक निर्णय देणारे महान विधितज्ञ पी.बी.सावंत सरांच्या झालेल्या दुःखद निधनाने आमच्यासारख्या समतावादी आंबेडकरी कार्यकर्त्यांची अपरिमित हानी तर झालीच आहे परंतु एकूणच भारतीय विधीशाखेची व धर्मनिरपेक्ष विचारसरणीची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात न भरून निघणारे नुकसान झाले असून एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे भीम आर्मी महाराष्ट्र राज्याचे राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांनी पी.बी.सावंत सरांच्या निधनानंतर आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हंटले आहे.
ह्या पुरोगामी ताऱ्याला भीम आर्मी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करीत आहोत , असेही राज्यप्रमुख मा.प्रफुल्लभाई शेंडे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.
रिपोर्टर