गोळवशी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला

लांजा(महादेव गोळवसकर)- रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गोळवशी  गावची ग्रामपंचायत १९८५ पासून शिवसेना  प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या झंझावाताने कोकण शिवसेनामय झाला. तेव्हा पासून गोळवशी गाव शिवसेनेच्या प्रवाहात आला.तेव्हा पासून ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यत सर्व लोकप्रतिनिधी शिवसेनेचे सदस्य निवडून येत आहेत. 
     
२०२१ - २०२५ पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्या पासून उमेदवारी बाबत उत्सुकता होती. ग्रामपंचायतीचे सात सदस्य आहेत. तीन मतदार संघात सात सदस्य असल्याने सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले.तीन मतदार संघात सात सदस्यांचे उमेदवारी अर्ज आल्याने ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बिनविरोध निवड झाली. 
       
मतदार संघ क्रमांक १ -  श्रीमती श्रुतिका  श्रीधर गुरव, श्रीमती राजश्री राजेश तेली, श्री. गणेश शांताराम खानविलकर मतदार संघ क्रमांक २ - कुमारी सायली राजेश पवार , श्री.दत्ताराम काशिराम वीर संघ क्रमांक ३ -  श्रीमती अंजली अशोक भालेकर, श्री. आत्माराम यशवंत वीर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली.सदस्य सात आणि उमेदवारी अर्ज सात आल्याने बिनविरोध निवडून आले. 
       
गोळवशी गावात  १९८५ पासून विविध नागरी विकास कामे करण्यासाठी आमदार, खासदार यांचे सहकार्य लाभते आहे.गावात सन २०१३ मुंबईकर  ग्रामस्थांनी गोळवशी ग्रामविकास सेवा समिती स्थापन करून गावच्या विकासाकरिता झपाट्याने कामे करीत आहेत.गावात दोन मोठी कामे गोळवशी ग्रामविकास सेवा समितीच्या माध्यमातून मुचकुंदी नदीवर वाहतूक पूल व गोळवशी आंबा ते श्री देव धावजी मंदिर मार्ग पाच किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे.   आज, सरपंच व उप सरपंच पदी मा.श्री.दत्ताराम वीर , श्रीमती राजश्री राजेश तेली यांची  बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या सदस्य बिनविरोध निवडून आणण्यासाठी संतोष गुरव, अशोक गुरव, सुरेश भालेकर,प्रकाश भालेकर, दिलीप रपसे,राजू खानविलकर, राजेश तेली, तुकाराम शिनगारे, सुरेश खानविलकर, महादेव खानविलकर,  श्रीधर गुरव, गणेश खानविलकर, कृष्णा वीर, शांताराम वीर, बाबू गुरव, प्रकाश पवार, महेंद्र पवार इत्यादी मेहनत घेतली. 
       
शिवसेनेने पुन्हा एकदा गोळवशी ग्रामपंचायतीवर आमदार राजन साळवी, खासदार  विनायक राऊत,पालक मंञी अँड. अनिल परब मार्गदर्शनाने भगवा झेंडा फडकला. 

सर्व ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट दाखवली त्याबद्दल    गोळवशी ग्रामविकास सेवा समिती चे अध्यक्ष बाबू गुरव यांनी  ग्रामस्थांचे आभार मानले व नवीन  सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

संबंधित पोस्ट