कारागृहाचे अधिक्षक अंबादास पाटील निलंबित

अर्णब गोस्वामी हे कारागृहात असताना त्यांना मोबाईल वापरण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

अलिबाग: कारागृह अधिक्षकाना निलंबित करण्यात आले.अर्णव गोस्वामी यांना जेलमधे मोबाईल पुरवणे व्ही.आय.पी.ट्रीटमेंट देणे यांना चांगलेच महागात पडले.खातेनिहाय चौकशीनंतर पाटील यांच्यावर कारवाई झाली तपासात त्यांनी अर्णवला मोबाईल पुरविल्याचे स्पष्ट झाले.याप्रकरणी यापुर्वीच दोन कर्मचार्यावर निलंबनाची कारवाई झाली.

रायगड पोलीसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी,फिरोज शेख,नीतेश सारडा यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथुन अटक केली  मे.अलिबाग न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालीन कोठडी सुनावली होती.

अर्णवसह नितेश आणि फिरोज यांना अलिबाग नगर परिषद शाळा क्रमांक १ मधे ठेवण्यात आले होते.या ठिकाणी अलिबाग जिल्हा कारागृहाचे पोलीस तैनात करण्यात आले होते.६ नोव्हेंबर रोजी अर्णव यांना जेल  पोलीसांनी मोबाईल पुरविल्याचे प्रकरण बाहेर आले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट