ख्यातनाम दिवंगत अभिनेत्री सौ. उमा प्रकाश भेंडे चौकाचे नामकरणप्रीत्यर्थ लोकार्पण सोहळा

मुंबई : सायन पश्चिम येथील साधना विद्यालय समोरील चौकाला आज सकाळी दि. ४ फेब्रुवारी रोजी ख्यातनाम दिवंगत अभिनेत्री सौ. उमा प्रकाश भेंडे यांचे नाव देण्यात आलं. हया चौकाचे नामकरणप्रीत्यर्थ लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाजपा नगरसेविका सौ. राजेश्री राजेश शिरवाडकर, राजेश शिरवाडकर (दक्षिण मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष, भाजपा), अभिनेत्री उमा व प्रकाश भेंडे यांचे चिरंजीव प्रसिध्द कॅमेरामन प्रसाद भेंडे व प्रसन्न भेंडे, सूना, नातवंडं यांच्यासहित चित्रपट व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

संबंधित पोस्ट