ॐ नमो भगवते श्री भालचंद्राय नमो नमःयोगीराज श्री भालचंद्र महाराजांचे जन्मोत्सवास प्रारंभ!

कणकवली - सालाबादप्रमाणे याही वर्षी, सिद्धयोगी, परमहंस, अनाथाचे नाथ श्री भालचंद्र महाराज, यांचा ११७ वा जन्मोत्सवांस महाराजांचे समाधीस्थानी अर्थात श्रीक्षेत्र कणकवली नगरीत शनिवार दि. ३० जानेवारी पासून समाधीपूजन करून काकड आरतीने प्रारंभ झाला. यावेळी संपूर्ण समाधीस्थानी रंगीबेरंगी फुलांची नेत्रदिपक सजावट करण्यात आली होती. सदर जन्मोत्सवसोहळा  बुधवार दि. ३ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असून, त्यानिमित्ताने समाधीस्थानी विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. 

श्री भालचंद्र महाराज हि एक दिव्य अलौकिक विभूती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली. त्यांच्या अंतरसाक्षीत्वाची अनेकांना प्रचिती आली; त्यांचे दिव्य अनुभव अनेक जनांना आले,आताही येत आहेत व पुढेही येत राहतील. आयुष्यभर अखंड तपसाधनेत मग्न राहून, दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांची दुःख निवारण करणारे बाबा, सदैव मौनामध्ये व विदेही (दिगंबर) अवस्थेत असत. त्यांचे स्वरूप नित्यशुद्ध, निराकार, निरंजन, निरामय असे होते, सदैव परमेश्वरी चिंतनात तल्लीन, ब्रह्मानंदी लीन राहिल्याने, अखिल चराचरांशी, विश्वांशी त्यांची एकरूपता पाहावयास मिळत होती, ईश्वरीशक्तीशी तादाम्य पावल्याने त्यांना एक प्रखर देवत्व प्राप्त झाले होते. अश्या ह्या 'परमेश्वर स्वरूप' असणाऱ्या सिद्ध महात्म्यांचे दर्शनाने, भाविकभक्तांना आत्यंतिक समाधान व प्रसन्नता लाभत असे, भक्त भावविभोर होऊन भावभक्तीने ईश्वरीचिंतनात तल्लीन होऊन जात. 

आजही अनेक जाती-धर्माचे-पंथाचे लोक भालचंद्र बाबांना, आपले हक्काचे सद्गुरू, आपले दुःख निवारण करणारे मायमाऊली मानतात. आज अनेक दुःखपीडिताचे ते तारणहार झाले असून अनेकांसाठी ते एक "शक्तीस्थान" आहेत तसेच बहुजनांचे ते "आधारस्तंभ" होऊन राहिले आहेत. या क्षणीही महाराजांची अखंड भक्ती करणारे सदभक्त  आहेत, महाराजांवरील अतीव प्रेमाने, समाधीस्थानी आल्यावर, समाधीचे दर्शनाने, ते सर्व भक्त अतिशय भावविभोर होऊन जातात, त्यांना मनोमनी प्रसन्नता लाभून ते जीवनी आनंदी व सुखसमाधानाने जगतात, वागतात व नांदतात आणि अशा चैतन्यदायी असणाऱ्या समाधीस्थानी भालचंद्र महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती अनुभवतात.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट