भांडूप येथील सोनापूर परिसरात एका तरुणांचा संशयित मृत्यू! खून झाल्याचा नातेवाईकांचा आरोप!
- by Reporter
- Jan 31, 2021
- 562 views
मुंबई (जीवन तांबे)भांडुप येथील सोनापूर परिसरातील बिस्मिल्ला मांझील, झकेरीया कंपाउंड मध्ये शनिवारी पहाटे एका तरुणांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.मयत अब्दुल रहमान अबुसमा चौधरी वय- 20 असे मृत्यू व्यक्तीचे नांव आहे.
अब्दुल गेल्या कित्येक महिन्यापासून मुब्रा या ठिकाणी रहात होता. तो व्यसनाधीन होता. शुक्रवारी तो आपल्या भाऊ रहात असलेल्या भांडुप येथील बिस्मिल्ला मांझील, झकेरीया कंपाउंड,सोनापूर आला होता. मात्र शनिवारी पहाटे त्याला कोणी तरी मारले असल्याने त्यांच्या जब्बर डोक्याला मार लागला आहे. असे त्याच्या भावाला सांगण्यात आले.त्याने तत्काळ जखमी भावाला उपचाराकरिता मुलुंड येथील अग्रवाल हॉस्पिटल दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.मृतदेह शवविच्छेदन करिता पोलिसांनी घाटकोपर येथील राजावाडी पालिका रुग्णालयात पाठीवले आहे. परंतु अद्याप शवविच्छेदचा रिपोर्ट आला नसल्याने मृत्यूचे कारण स्पस्ट झालेले नाही.
माझा भाऊ नशा करायचा त्याचा कोणा बरोबर वाद झाला असल्याने त्याला मारण्यात आलेले आहे. पोलिसांनी सिसिटीव्ही फुटेज द्वारे आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याची मागणी मयतचा भाऊ अमिररुद्दीन चौधरी व नातेवाईकांनी केली आहे.
रिपोर्टर