अपघाती रस्त्यावर मारले झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे !!

उरण -  एकादशी निमित्त सामाजिक महात्म्य लक्षात घेऊन वशेणी इतिहास संपादकीय मंडळा कडून उरण तालुक्यातील सारडे ते वशेणी दरम्यान खारपाडा रस्त्यावरील अपघाती वळणावर तीन ठिकाणी झेब्रा क्राॅसिंगचे पट्टे मारण्यात आले.

वशेणी दादरफाटा ते सारडे  पुल या दरम्यान आज पर्यत अनेक अपघात झाले आहेत.

या अपघाताची कारणे अनेक आहेत, भविष्यात या ठिकाणी अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांनी वाहने सावकाश चालवावी या साठी इशारा म्हणून हे झेब्रा क्राॅसिंग पट्टे मारण्यात आले आहेत असे मत या वेळी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक  मच्छिंद्र म्हात्रे यांनी मांडले.

तसेच हा रस्ता जरी सुसाट, मोकळा, रूंद असला तरी प्रत्येक वाहन चालकाने या भागात मनाचा ब्रेक लावूनच वाहन चालवावे असे आवाहन देखील केले.

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून दर एकादशीला  काही ना काहीतरी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात, या उपक्रमांचा कार्य अहवाल लेखाजोगी स्वरूपात असावा म्हणून मंडळातर्फे ग्रामपंचायत सदस्य  संदेश गावंड, ग्रामपंचायत सदस्य  गणपत ठाकूर, वशेणी गाव अध्यक्ष  पुरुषोत्तम पाटील यांच्या शुभहस्ते कार्यपुस्तिकेचे प्रकाशन हनुमान मंदिर वशेणी येथे करण्यात आले.

या वेळी  डाॅ.रविंद्र गावंड, गणेश खोत, हरिश्चंद्र ठाकूर,  कैलास पाटील, बी जे म्हात्रे,  अनंत म्हात्रे, राजेश पाटील, अनंता ठाकूर, मिलिंद पाटील, गावातील युवावर्ग तसेच माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रविण ठाकूर यांनी केले.



संबंधित पोस्ट