लोकनेते दि बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

उरण - रक्त अभावी रुग्णांची होत असलेली हेळसांड व  रक्ताची निकड लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून  आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे रविवार दि 10/1/2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी  2 यावेळेत  आई रत्नेश्वरी मंदिर जसखार - उरण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला विशेषतः तरुण वर्गाचा यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाले. 

लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि 10/1/2021 रोजी सकाळी  10 ते दुपारी 2 या वेळेत आई रत्नेश्वरी मंदिर जसखार -उरण  येथे करण्यात आले होते यावेळी  55 जणांनी रक्तदान केले. आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे विशाल पाटील, तुषार पाटील, चेतन गावंड, सुमित थळे, करण नारंगीकर, समीर ठाकूर, प्रशांत पाटील, रवींद्र भोईर, महेश पाटील, रत्नदीप पाटील, संग्राम ठाकूर, अनिल घरत आदी पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.



संबंधित पोस्ट