आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न !!
- by Reporter
- Jan 10, 2021
- 1109 views
उरण : दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेच्या उरण विभागाच्या वतीने रविवार दिनांक १० जानेवारी रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जसखार येथील रत्नेश्वरी देवी सभागृहात सदर कार्यक्रम संपन्न झाला. साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील, कामगार नेते भूषण पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, दिपक ठाकूर, उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील, संतोष पवार तसेच जसखार ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच काशिबाई ठाकूर यांच्या उपस्थितीत शिबीराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी केले. या प्रसंगी प्रा.राजेंद्र मढवी व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे विशाल पाटील (उरण तालुकाध्यक्ष), चेतन गावंड (उरण कार्याध्यक्ष), रविंद्र भोईर (उरण शहराध्यक्ष), महेश पाटील, समिर ठाकूर, संग्राम ठाकूर, करण नारंगीकर यांनी शिबीराचे नियोजन करून कार्यवाही केली. संस्थेच्या वतीने विश्राम मोहीते,गौरव म्हात्रे, नंदकुमार ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवली.
नवी मुंबई ब्लड बँक, खारघर यांच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबीरात पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. राज्यात सध्याच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेने केलेल्या बहुमोल प्रयत्नांबद्दल परिसरात कौतुक होत आहे.
रिपोर्टर