
आत्महत्या करायला निघालेल्या महिलेचा जीव वाचवून भांडूप पोलिसांनी केली प्रशंसनीय कामगिरी
- by Reporter
- Jan 08, 2021
- 1603 views
मुंबई (शेखर भोसले) नवऱ्यासोबत झालेल्या घरगुती वादामुळे समुद्रात उडी मारून आत्महत्या करायला निघालेल्या व तत्पूर्वी त्याची कल्पना आपल्या वडिलांना मोबाईलवर मेसेज करून देणाऱ्या भांडूप .येथील एका महिलेचा जीव वाचवण्याचे महत्वपूर्ण कार्य भांडूप पोलिसांनी मालाड पोलिसांच्या साथीने केले. सदर महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखून तिचा जीव वाचवणार्या ह्या यशस्वी कामगिरीत सहभागी असणाऱ्या सर्व पोलिसांचा मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सन्मानपत्र देवून गौरव केला आहे.
कार्यालयातील स.पो.नि. भंडारे यांच्या मदतीने समन्वय साधून व सदर महिलेच्या मोबाइलवर सतत फोन करून संपर्क साधला. परंतु सदर महिलेने मोबाईल फोन बंद करून ठेवला होता. अचानक सदर महिलेने अचानक फोन चालू केल्याने तिचे लोकेशन पोलिसांना प्राप्त झाले. तिचे लोकेशन अक्सा बीच याठिकाणी मिळून आल्याने पो.नि. उनवणे यांनी सदर बाब मालाड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल आव्हाड व मालाड पोलिस ठाण्याचे म.स.पो.नि. कदम यांना कळवली. त्यांनी सदर महिलेस अक्सा बीच, मालाड येथून ताब्यात घेतले व महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. अशा प्रकारे पो.नि उन्हवणे भांडुप, मालाड पोलिस ठाण्याचे मसपोनि. कदम, बीट मार्शल आव्हाड तसेच भांडुप पोलिस ठाण्याचे सपोनि.भंडारे, पो.शि. भामरे यांनी तात्काळ केलेल्या प्रयत्नामुळे व समन्वयामुळे सदर महिलेला ४५ मिनिटात शोधण्यात व तिला वाचविण्यात यश आले. त्यांच्या या प्रशंसनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मुंबई परमबीर सिंह व कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या सर्वांना प्रशंसापत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले आहे.
रिपोर्टर