उद्धव ठाकरे साहेब अन्वय नाईककडून घेतलेल्या १९ घरांचे काय झाले..? - किरीट सोमैया

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार यांनी २१ मार्च २०१४ ला अन्वय नाईक परिवाराकडून अलिबाग जवळच्या कोलेई गावातल्या ३० जमिनी विकत घेतल्या. आम्ही आज कोर्लई गावात जाऊन या संबंधित अधिक माहिती घेतली. ग्रामपंचायत, तलाठी/तहसीलदारच्या रेकॉर्डवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

आजच्या कोर्लई दौर्‍यात डॉ.किरीट सोमैया, आमदार प्रशांत ठाकुर, जिल्हाध्यक्ष महेश मोहिते इत्यादी उपस्थित होते.

१२ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे परिवार, रविंद्र वायकर परिवार आणि अन्वय नाईक परिवाराच्या आर्थिक/जमिनीचे व्यवहार या संबंधीची माहिती, खुलासा आम्ही जनतेला दिला. आश्चर्याची बाब अशी आहे की, अन्वय नाईक यांच्या या ३० जमिनी ठाकरे, वायकर परिवाराने विकत घेतल्या. हा व्यवहार २१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झाला, त्याचे अ‍ॅग्रिमेंट ट्रान्सफर व सगळे पेपरवर्क पूर्ण झाले.

परंतू या जमिनीवर १९ घरं ज्यांचे बांधकाम ५५० स्क्वेअर फुट पासून २५०० स्क्वेअर फुट पर्यंतची १९ घरं अस्तित्वात होती/आहेत. असे ठाकरे व नाईक परिवारचे डॉक्युमेंट पाहता दिसत आहे. ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड्स पाहिल्यावर लक्षात येते की २००९-२०१० पासून ही घरं त्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. या १९ घरांचे एकुण बांधकाम २३५०० स्क्वेअर फूट आहे,याचे ग्रामपंचायत, राज्य सरकारच्या रेडी रेकनर प्रमाणे मूल्य रुपये ५ कोटी २९ लाख होते.

२१ मार्च २०१४ रोजी अन्वय नाईक परिवाराकडून उद्धव ठाकरे परिवाराने या सर्व जमिनी घरांसह विकत घेतल्या, परंतू १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत म्हणजेच आम्ही हा खुलासा करे पर्यंत ही घरं कै. अन्वय नाईकच्या नावाने ग्रामपंचायतीत होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही बेनामी प्रॉपर्टी तर नाही ना...?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी ही ५ कोटींची १९ घरं त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवल्याचे दिसत नाही, लक्षात येत नाहीत. या संबंधी मुख्यमंत्री स्पष्टता करणार का?

ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड पाहताना २०१९ - २०२०, २०२०-२०२१ चे जे प्रोसिडींग बूक, फॉर्म ८ व अन्य जे रोकॉर्ड्स आहेत त्यात स्पष्टता नाही, त्यात तारीख, केव्हा बैठका झाल्या याचा अधिकृत तपशीलात गोंधळ दिसत आहे. ग्रामपंचायतीत ही १९ घरं श्रीमती रश्मी ठाकरे यांच्या नावावर करावी असा ठराव ७ जून २०१९ च्या तारखेचा असल्याचे भासवले जात आहे, परंतू तो व्यवहार अधिकृत १२ नोव्हेंबर २०२० नंतर झाला असल्याचे ग्रामसेवक व तलाठी यांनी अम्हाला सांगितले.

याचा अर्थ अन्वय नाईकची १९ घरं हे ठाकरे परिवार २०१४ ते २०२० म्हणजे ६ वर्ष बेनामी संपत्ती म्हणून.....

दुसरा आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो की, कै. अन्वय नाईक यांचा मृत्यू २०१८ मध्ये झाला परंतू श्री उद्धव ठाकरे परिवाराच्या नावाने ही घरं करण्याचा अर्ज, ठराव, पैसे भरणे, अधिकृत करणे हा सर्व व्यवहार हे २०२० नोव्हेंबर मध्ये  किंवा त्या काळामध्ये झाला याची कायदेशीर स्थिती काय?

असा व्यवहार करण्यासाठी कै. अन्वय नाईकच्या मृत्यूनंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का? या संबंधीही स्पष्टता हवी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक परिवाराशी असलेल्या अर्थिक संबंधां विषयी स्पष्टता करावी असा प्रश्न भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट