गोळवशी ग्रामपंचायतीने राखली बिनविरोध निवडणूकीची परंपरा.
- by Adarsh Maharashtra
- Jan 06, 2021
- 1438 views
रत्नागिरी : महाराष्ट्र निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती निवडणूका जाहीर केल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गोळवशी गावची ग्रामपंचायत १९८५ पासून स्थानिक शिवसैनिक ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आणीत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 'चलो कोकण ' भगवा सप्ताहाच्या आदेशाचे पालन करून संपूर्ण गाव भगवामय झाला ती परंपरा ३५ वर्षानंतरही सुरू आहे.
२०२० - २०२१ पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्या पासून उमेदवारी बाबत उत्सुकता होती. ग्रामपंचायतीचे सात सदस्य आहेत. तीन मतदार संघात सात सदस्य असल्याने सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले.४ जानेवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती.तीन मतदार संघात सात सदस्यांचे उमेदवारी अर्ज आल्याने ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
मतदार संघ क्रमांक १ - श्रीमती श्रुतिका श्रीधर गुरव, श्रीमती राजश्री राजेश तेली, श्री. गणेश शांताराम खानविलकर मतदार संघ क्रमांक २ - कुमारी सायली राजेश पवार , श्री.दत्ताराम काशिराम वीर संघ क्रमांक ३ - श्रीमती अंजली अशोक भालेकर, श्री. आत्माराम यशवंत वीर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली.सदस्य सात आणि उमेदवारी अर्ज सात आल्याने बिनविरोध निवडून आले.
लांजा तालुक्यातील गोळवशी गाव शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गावात १९८५ पासून अनेक सोईसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. गावाच्या विकासाला गती देण्यासाठी ' गोळवशी ग्रामविकास सेवा समिती ' कार्यरत आहे. समितीने दोन मोठ्या कामांची आमदार राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडून पूर्तता करून घेतली आहे. गोळवशी - वडदहसोळ समांतर वाहणार्या मुचकुंदी नदीवर मुचकुंदी नदीवर वाहतूक पूल बांधण्यासाठी खासदार साहेबांनी निधीची आणि आमदार साहेबांनी गोळवशी आंबा पासून श्री देव धावजीमंदिर पर्यंत चा पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाला निधीची मंजुरी मिळवली, दोन्ही कामे सुरु आहेत.जवळपास साडेसात कोटीची कामे सुरु आहेत.वाहतूक पूलाचे काम पुर्ण झाल्यावर लांजा-गोळवशी मार्गे वडदहसोळ- राजापूर वाहतूक सेवा सुरु करण्यात येईल.
गोळवशी ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी स्थानिक शिवसेना पदाधिकार्यानी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली त्यात सुरेश भालेकर शाखाप्रमुख, संतोष गुरव साटवली विभाग प्रमुख, अशोक गुरव माजी सरपंच, प्रकाश भालेकर माजी विभाग प्रमुख, राजू खानविलकर उप शाखाप्रमुख, सुरेश खानविलकर माजी पोलिस पाटील, महेश वीर पोलिस पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष महादेव खानविलकर, तुकाराम शिनगारे गावकार,कृष्णा वीर,दिलीप रपसे,राजू तेली, राजाराम आमटे,कृष्णा बिर्हाडी ,सिद्धार्थ पवार, गणेश खानविलकर, श्रीधर गुरव गोळवशी ग्रामविकास सेवा समितीचे अध्यक्ष बाबू गुरव, शांताराम वीर,प्रकाश पवार, महेंद्र पवार यांचा समावेश होता. नवनिर्वाचित सदस्यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल गोळवशी ग्रामविकास सेवा समिती च्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम