आठ बँकांना ४८३७ कोटींचा चुना IVRCL कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली,दि ३१ : बँकांची आर्थिक स्थिती गंभीर असताना अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्ही आरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एसबीआयच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.सी.जोशी यांनी दिली. “आरोपींनी अज्ञात लोक सेवक आणि अन्य व्यक्तींसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, एक्झिम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँकांची एकूण ४ हजार ८३७ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली,” अशी माहिती जोशी यांनी दिली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट