कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षांचा कारावास

नवी दिल्ली :कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासह तिघांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने 1999 मध्ये झारखंडमधील एका कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमतता संबंधित कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिलीप रे यांना शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने नुकताच त्यांना दोषी ठरवले होते.विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी शिक्षा सुनावताना सर्व दोषींना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दिलीप रे यांच्याशिवाय कोळसा मंत्रालयाचे दोन तत्कालीन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम, केस्ट्रोन टेक्नॉलॉजी लि.चे (सीटीएल) संचालक महेंद्रकुमार अग्रवाल आणि केस्ट्रॉन मायनिंग लि.लाही (सीएमएल) दोषी ठरवले होते.न्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

           कोण आहेत दिलीप रे

दिलीप रे हे बिजू जनता दलाचे (बीजेडी) संस्थापक सदस्य आहेत. बिजू पटनायक यांच्या ते अत्यंत निकटवर्तीय होते. परंतु, नंतर त्यांनी आपला पक्ष बदलला आणि ते भाजपत सहभागी झाले. 2014 मध्ये भाजपच्या तिकीटीवर ते राऊरकेला येथून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये निवडणुकीआधी त्यांनी भाजपचा त्याग केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला.भाजपचा त्याग केल्यानंतर ते आपला पूर्वीचा पक्ष बीजेडीमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ते राजकारणापासून दूर राहिले. आता कोळासा घोटाळ्याप्रकरणी त्यांना 3 वर्षांची शिक्षा झाली आहे. दरम्यान, रे यांचे वकील मनु शर्मा यांनी या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट