बारामती पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
- by Reporter
- Sep 19, 2020
- 464 views
पुणे (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हदीत दरोडा टाकुन औषधांचा आणि सिगारेटचा कंटेनर लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरूध्द मोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे.वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोरगाव - निरा रोडवर ४ जून २०२० रोजी आयशर ट्रक नंबर N.L. ०१ L ४३३९ या ट्रकमध्ये I.T.C. राजंणगाव कंपनीमध्ये तयार झालेली
फिल्टर सिगारेट बॉक्स असा ४ कोटी ६१ लाख ८८ हजार ८२० रूपये किंमतीचा माल भरून तो राजणगाव एम.आय.डी.सी. हुन हुबळी कर्नाटक या ठिकाणी घेवून जात असताना राजणगाव एम.आय.डी.सी न्हावरा पारगाव केडगाव चौफुला -सुपा मार्गे हुबळीकडे जात असताना १३ अनोळखी इसमांनी सिगारेटचा ट्रक दरोडा टाकून लुटला होता.सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे
पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स.पो.नि. गुड, पो.स.ई मोरे व पथक यांचे मदतीने वडगाव निंबाळकर पोलिसांनी सदर गुन्हयातील आरोपी
१) कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (वय ४४),
२) ओमप्रकाश कृष्णा झाला (वय ३८),
३) दिनेश वासुदेव झाला (वय ५०),
४) सुशिल राजेंद्र झाला (३७),
५) मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (४२),
६) सतिश अंतरसिह झांझा (वय ४०),
७) मनोज केसरसिंग गुडेन (वय ४०)
राहणार सर्व देवास, या आरोपींना अटक करून सदर गुन्ह्यातील ३ कोटी ८९ लाख ३४ हजार ७९२ चा मुदेमाल व दोन ट्रक यातील आरोपींकडून जप्त पोलिसांनी जप्त केला.या गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र राज्यात यवत, शिक्रापूर, शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे दाखल होते. परराज्यामध्ये कर्नाटक येथे ब्यादगी, हुबळी, पोलीस स्टेशन हद्दीत, तसंच उत्तरप्रदेश येथे खोराबार, पश्चिम बंगाल, ओरीसा, हरीयाणा राज्यात देखील या आरोपींनी औषधे असणाऱ्या ट्रकवर तसंच सिगारेटचे ट्रकवर दरोडा टाकून ट्रकमधील माल लुटून नेल्याचे गुन्हे दाखल होते.

रिपोर्टर