राज्यात कोविडसंदर्भात २ लाख ५७ हजार गुन्हे, २५ कोटी २५ लाख रुपयांची दंड आकारणी गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार दोन  लाख ५७ हजार गुन्हे दाखल तर २५ कोटी २५ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात दि.२२ मार्च ते १६ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,५७,८३७  गुन्हे नोंद झाले असून ३४,९५८ व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्ह्यांसाठी  २५ कोटी २५ लाख ४४  हजार ६६४ रु. दंड आकारण्यात आला.

कडक कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३५६ घटना घडल्या. त्यात ८९४ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर- १ लाख १३ हजार फोन

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.  लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,०४४ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,१६० वाहने जप्त करण्यात आली.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील १८७ पोलीस व २१ अधिकारी अशा एकूण २०८ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही

संबंधित पोस्ट