
बोरामणी विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला हा निर्णय.
- by Reporter
- Sep 15, 2020
- 1644 views
सोलापूर (प्रतिनिधी) : बोरामणी विमानतळासाठी लागणारी वनविभागाच्या जमिनीबाबत ताबडतोब नागपूर येथे प्रस्ताव पाठवून मंजूर करून घ्यावा असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले़ याशिवाय खासगी जमीन भूसंपादन व इतर बाबीसाठी ५० कोटी रूपयाचा निधी मंजूर केला.सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे़ या बोरामणी विमानतळाच्या विषयी आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. प्रणिती शिंदे,प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वल्ला नायर, विमानतळ प्राधिकरणाचे दिपक कपूर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह अन्य अधिकारी व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर