माझा कार्यकर्ता हा तळागाळातील सर्व सामान्य घटका पर्यंत पोहचला तर मला खूप अभिमान वाटेल -राज्यमंत्री मा.बच्चूभाऊ कडू

पिंपरी (प्रतिनिधी) : पिपरी चिंचवड येथे प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज्यमंत्री मा. श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दौंड तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.तसेच मा.बच्चु

भाऊ कडू यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


१) संजय गांधी निराधार योजनेचे  दिव्यांग ,श्रावणबाळ योजना अनुदान तात्काळ खात्यावर जमा करावे.


२)दौंड तालुक्यातील नापीक(पाझर) होत चाललेल्या जमिनी बाबत उत्पन्न कमी होण्याबाबत उपाय योजना करण्यात यावी.


3) हातवळण येथे महिलांसाठी अस्मिता भवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.

यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते दौंड तालुका अध्यक्षपदी मा. श्री.रमेश भाऊ शितोळे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.या वेळी मा.श्री.अजय महाराज बारस्कर,महाराष्ट्र राज्य दारुबंदी समिती प्रदेशाध्यक्ष मा. श्री मंगेशदादा फडके, पुणे जिल्हा संघटक मा.श्री.नीरज भाऊ कडू, नंदकिशोर जी जगदाळे,अध्यक्ष महेश करनुरे,हवेली अध्यक्ष प्रजोल जवळकर आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

राज्यमंत्री मा. श्री बच्चूभाऊ कडू यांनी आपले विचार मांडताना माझा कार्यकर्ता हा तळागाळातील सर्व सामान्य घटका पर्यंत पोहचला तर मला खूप अभिमान वाटेल, असे मनोगत व्यक्त केले.

संबंधित पोस्ट