कोरोनाने देश हादरणार गेल्या २४ तासांत ९५ हजार ७३५ नवे कोरोना रुग्ण

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ४४ लाखांच्या घरात गेली आहे. गेल्या २४ तासांत रेकॉर्ड ब्रेक ९५ हजार ७३५ नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. याआधी ६ सप्टेंबर रोजी ९३ हजार ७२३ कोरोना रुग्ण सापडले होते. तर एका दिवसात ११७२ जणांचा मृत्यू झाला. यासह एकूण मृतांची संख्या ७५ हजार ६२ झाली आहे.

यात दिलासादायक बाब म्हणजे भारत हा जगातला दुसरा देश ठरला आहे, जेथे सर्वात जास्त रुग्ण निरोगी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३४ लाख ७१ हजार ७८४ रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट ७७.७४% आहे. असे असले तरी देशात अजूनही ९ लाख १९ हजार १८ अक्टिव्ह रुग्ण आहेत.

दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५

करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६१ करोनाबाधित पुणे जिल्ह्य़ात आहेत.

संबंधित पोस्ट