कार चालवताना मास्क घालणं आवश्यक आहे? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं हे उत्तर!

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी स्पष्ट केलं आहे की, कार चालवणाऱ्याने मास्क घालणं आवश्यक आहे. भारतातील कोविड १९ च्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, सायकल चालवताना किंवा कार चालवताना मास्क घालणं बंधनकारक आहे.त्याचप्रमाणे जॉगिंग करताना देखील मास्क आवश्यक आहे. याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्वे जाहीर केले नाहीत. पण गाडी चालवताना तुम्ही एकटे असाल तर मास्क घालण्याची गरज नाही. गाडीत एकाहून अधिक लोक असतील तर मास्क घालणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.भारतातील कोरोना विषाणूच्या परिस्थितीविषयी बोलताना ते म्हणाले की, कोविड -१९मध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.

भारतातील ५ राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आहेत.तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यातील २५ टक्के रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मृत्यूदरही सर्वाधिक आहे.आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, "आम्ही पूर्व-आवश्यक पायाभूत सुविधा व सेवा सुनिश्चित केल्या आहेत. कोरोनाच्या रूग्णांसाठी सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सध्याच्या काळात आयसीयू आणि आयसोल्यूशन बेड्सची संख्या आणि चाचण्या वाढण्यावर भर दिला आहे. त्यानंतरच सरकारने अर्थव्यवस्थेला हळूहळू सुरुवात केली आहे.याव्यतिरिक्त आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की भारतात आतापर्यंत ४.५० कोटी चाचण्या घेतल्या आहेत. आरोग्य सचिव म्हणाले, "दररोज कोरोनाच्या चाचण्यांची देशात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत ११.७ लाख चाचण्या देशात घेण्यात आल्या आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट