
२४ तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या, जगभरातील सर्व देशांना मागे टाकलं
- by Reporter
- Sep 03, 2020
- 384 views
नवी दिल्ली (प्रतिनिधी) : गुरूवारी भारतात कोरोनाबाधितांचा आकडा रेकॉर्ड ब्रेक करणारा होता. गेल्या २४ तासांत कोरोनाबाधित ८३,८८३ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात एवढे रुग्ण ही आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे. यानुसार आतापर्यंत भारतात ३८,५३,४०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये ८.१५ लाख केस ऍक्टिव आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ८.८ लाखावर गेला आहे. आंध्रप्रदेशमध्ये हा आकडा ४. लाख आहे. आरोग्य आणि कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत ११,७०,००० हून अधिक केस ऍक्टिव आहेत.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या ८ लाख १५ हजार ५३८ अक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, ६७ हजार ३७६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २९ लाख ७० हजार ४९३ रुग्ण निरोगी झाले आहे.
अमेरिका-ब्राझील या देशांपेक्षा भारतात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.अमेरिका-ब्राझीलमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ४० हजार 899 तर, ब्राझीलमध्ये ४८ हजार ६३२ रुग्ण सापडले.
रिपोर्टर