
विक्रोळी अग्निशामक अधिकारी तुकाराम पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पदक
महाराष्ट्रातील अग्निशमन दलातील चार अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर
- by Adarsh Maharashtra
- Aug 29, 2020
- 1502 views
मुंबई (प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील प्रमुख अग्निशामक श्री तुकाराम मारुती पाटील यांनी आगीशी सामना करून निस्वार्थ पणे दुर्घटनेवर मात करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीयगृह मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले असून राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी मंजूरी दिली आहे
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी देशातील तसेच महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पदक दिले जाते. महाराष्ट्रातील चार अग्निशमन अधिकारी यांची राष्ट्रपती शौर्य पदाकरीता निवड केली असून अग्निशमन दलातील डेप्युटी चीफ फायर ऑफिसर यशवंत रामचंद्र जाधव. सिनियर स्टेशन ऑफिसर उमेश गोपाळ पालांडे. भायखळा अग्निशमन केंद्रातील प्रमुख अग्निशामक तुकाराम मारुती पाटील व अग्निशामक सतीश शिवाजी शिंगाडे यांना मानाचे राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर केल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर. यांच्या हस्ते 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त. बृहन्मुंबई महानगर पालिका मुख्यालय कार्यालयात चार अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
विक्रोळी टागोर नगर येथील तुकाराम मारुती पाटील. सह्याद्रीच्या पायथ्याशी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील. हिरण्यकेशी नदीचा काटी. रामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या राम तीर्थावर असणाऱ्या आजरा तालुक्यातील वडकशिवाले गावचे सुपुत्र असून लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली आणि बघता-बघता त्यांना मुंबई अग्निशमन दलात सेवा करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी आगीशी सामना करून निस्वार्थपणे विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनेवर मात करून अनेक नागरिकांचे व मालमत्तेचे रक्षण त्यांनी केले आहे.
मुंबईतील मेमन वाडा (भेंडीबाजार)फायर स्टेशन या ठिकाणी सन 1992 ली कामावर हजर झाल्यानंतर सन 1992-93 मध्ये हिंदू-मुस्लीम जातीय दंगल घडली त्यावेळी अहोरात्र काम करून नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे रक्षण व आग विझवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. तसेच 1996 मध्ये भेंडीबाजार पाक मोडिया स्ट्रीट ताज भाई मुन्नावी ही पाच मजली इमारत कोसळून त्याठिकाणी ढिगाऱ्याखाली सापडलेल्या अनेक लोकांचे प्राण वाचविण्याचे काम त्यांनी केले आहे.
सन 1997 वरळी येथील सी पी एस पुनम चेंबर बिल्डींग कोसळली होती त्यावेळेस इमारतीमध्ये अनेक लोक सापडले होते त्या लोकांये ही प्राण वाचवले आहेत.
26 जानेवारी 2001रोजी गुजरात राज्यातील कच्छ येथे मोठा भूकंप झाला त्यावेळी मुंबई अग्निशमन दलाची एक तुकडी पाठवण्यात आली होती त्यावेळीही तेथील बिल्डिंगच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले अनेक लोकांना बाहेर काढण्याचे काम त्यांनी केलेले आहेत.
27 ऑक्टोबर 2002 मध्ये विक्रोळी ते कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनच्या दरम्यान रेल्वे वॅगन 28 डब्यांची मालवाहू गाडी त्यातील एक डबा (ट्रँकर) पेटला होता त्या मालगाडीतील अति ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे ते डबे नाफ्ता ने भरलेले होते श्रीयुत पाटील हे ड्युटीवर जात असताना सुद्धा त्यांनी आग लागलेला डबा विजवण्याचे काम करून हजारो लोकांचे प्राण वाचविले. तसेच भारत पेट्रोलियम कंपनीचे व रेल्वेच्या मालमत्तेचे होणारे नुकसान देखील वाचविले.
26 जुलै 2005 मध्ये मुंबई येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडून अनेक ठिकाणी दुर्घटना झाल्या होत्या. साकीनाका येथे दरड कोसळून अनेक घरे जमिनीखाली गाडली गेली होती तेथील अनेक लोकांना बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवण्याचे कार्य केले.
सप्टेंबर 2008 बिहार राज्यांमध्ये नेपाळ बॉण्ड्री वरील धरण फुटून सहरसा जिल्ह्यातील खुशी नदीला पूर येऊन त्या पुरामध्ये अनेक लोक अडकलेली होती. नागरिकांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई अग्निशमन दलाची फ्लडॅ अंड रेस्क्यू ची तुकडी पावर बोटी सह रवाना केली होती. त्यामध्ये सिनिअर स्टेशन ऑफिसर उमेश पालांडे व प्रमुख अग्निशामक तुकाराम पाटील सहभागी होऊन अनेकांचे जीव वाचविले तेथील नागरिकांना संपर्क साधून शासनाने दिलेल्या अन्नाची पाकिटे, पाणी, कपडा, पुरवण्याचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती ती कामगिरी देखील त्यांनी चोखपणे पार पाडलेली आहे
तसेच 16 जुलै 2019 रोजी एम एस सारंग मार्ग कांबेकर स्ट्रीट डोंगरी याठिकाणी बिल्डिंग कोसळली होती त्यावेळी डेप्युटी चीफ फायर ऑफिसर यशवंत रामचंद्र जाधव स्टेशन ऑफिसर उमेश गोपाळ पालांडे भाईखेळा अग्निशमन स्टेशन मधील प्रमुख अग्निशामक तुकाराम मारुती पाटील व अग्निशामक सतीश शिवाजी शिंगाडे यांनी ढिगारा उपसत असताना पंधरा ते वीस फुटांच्या अंतरावर एका बाईचा रडण्याचा आवाज येऊ लागला त्यावेळी त्यांनी शोध घेण्याचे काम चालू केले त्या ठिकाणी काही बीम आडवे पडले होते ते बीम बाजूला केल्यामुळे थोडा पोकळ भाग दिसून आला तेथून पंधरा ते वीस फूट आत जाऊन त्या बाईला आवाज दिला असता त्या बाईचा आवाज कधी खालून तर कधी वरून येऊ लागला नंतर असे लक्षात आले की तो आवाज वरील भागातूनच येत होता त्यावेळी तिथून बाहेर येऊन अंदाज घेऊन ती बाई वरच्या बाजूस अडकलेली आहे हे निश्चित झाले त्यानंतर वरील बाजूस पंधरा ते वीस फुटाच्या अंतर सोडून काम सुरू केले नंतर दोन ते तीन फूट ढिगारा उपसून काढल्यानंतर त्या बाईचा हात निदर्शनात आला त्यानंतर त्या बाईला व तिच्या मुलांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात आले व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. हे ऑपरेशन जवळ जवळ बिल्डींग कोसळल्यानंतर 19 तास चालले होते त्यावेळी पाऊसही जोरात पडत होता पहाटेच्या पाच वाजता त्या बाईला बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आले इतका वेळ चाललेले ऑपरेशन यशस्वी करून सर्व सीनियर तसेच एन डी आर एफ ची टीम या सर्वांना आनंद झाला त्यावेळी सिनिअर ऑफिसर जाधव साहेब व पालांडे साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले
अशा अनेक प्रकारे देशाची सेवा करण्यासाठी तुकाराम पाटील नावाचे वादळ घोंगावत असताना अनेक संघटना, संस्था, प्रतिष्ठान, आदींनी त्यांची दखल घेतली त्यांना शंभराहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित मेडल त्यांना मिळालेले आहेत. तसेच मुंबई अग्निशमन दलाचे नावही त्यांनी उज्वल केलेले असून देशाची सेवा करण्याचा त्यांचा मानस असल्याचे तुकाराम पाटील यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
श्री तुकाराम पाटील यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वनिता फाऊंडेशनचे संपादक प्रभाकर कांबळे, अध्यक्ष वनिता कांबळे व पदाधिकारी सभासदाने त्यांचे कौतुक केले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम