चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिनी घरावर कोसळली!
- by Adarsh Maharashtra
- Aug 27, 2020
- 2159 views
मुंबई दि.27( जीवन तांबे ) चेंबूर येथील अमर महल पुलावरून ठाणे मार्ग जे.जे. हॉस्पीटला मृत्यू देह घेऊन जाणारी रुग्णवाहिनी जात असतानाच अचानक चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आज रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घरावर कोसळली मात्र घर मजबूत असल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
चेंबूर येथे इस्टर्न एक्सप्रेस हाय वे वर अमर महल पुलाजवळ पुलावरून एक रुग्णवाहिका कोसळली या रुग्णवाहिकेत एक मृतदेह होता हा मृतदेह ठाण्याहून मुंबईतल्या जे. जे रुग्णालयात नेण्यात येत होता.
भरधाव वेगात ही रुग्णवाहिका जात असताना चालकाच नियंत्रण सुटलं आणि ही रुग्णवाहिका पुलाच्या खाली असलेल्या दुकानावर पडली हे दुकान मजबूत असल्याने पुढील अनर्थ टळला चालक मात्र व्यवस्थित आहे. पूल कमकुवत झालेला आहे. यापूर्वी ही अशी घटना घडलेली आहे. पालिकेचे दुर्लक्ष असल्याने या घटना घडत आहे. टिळक नगर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.रुग्णवाहिनीका मध्ये मानपाडा पोलीस स्थानक अंतर्गत मर्डर केस झाली होती. तो मृत्यू देह जे.जे रुग्णालयात घेऊन जात होता.तेव्हा चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचे गाडी वरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम