दिलासादायक बातमी; भारती रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी

पुणे (प्रतिनिधी) : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, ॲस्ट्राझेनेको आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहभागातून निर्माण करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मानवी चाचणी आज पुण्यात पार पडली.पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये एका स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली आहे.

या लसीच्या दुसऱ्या तसेच तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देशातील काही शहरांमध्ये होणार आहे. त्यासाठी देशभरातील शंभर स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.

ही लस दिल्यानंतर तिचे काय परिणाम दिसून येतात याचा अभ्यास केला जाणार आहे. साधारणपणे आठवडाभरात हा अहवाल प्राप्त होईल.

पहिल्या टप्प्यातील चाचणीनंतर देशभरात आणखी पंधराशे जणांना ही लस दिली जाणार आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटलसह ससून हॉस्पिटल, केइएम तसेच जहांगिर हॉस्पिटलमध्ये पुढील काळात चाचण्या होणार आहेत.

चाचणी घेण्यात येत असलेल्या लशीचे ‘कोविशील्ड’ असे नामकरण करण्यात आलेल आहे. लवकरात लवकर ह्या चाचण्या पूर्ण होऊन कोरोना आजारावर एक परिणामकारक लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट