लॉकडाऊनमध्ये स्ट्रोकच्या रुग्णांना पुन्हा आत्मनिर्भर बनविताना

कोविड-१९ पॅनडेमिकच्या काळामध्ये टेलि-हेल्थ हीच चिकित्सेची 'नॉर्मल' पद्धत म्हणून रूढ होत असताना, न्यूरोमस्क्युलर आजारांच्या रुग्णांनाही व्हर्च्युअल उपचारांच्या माध्यमातून दूरस्थ पद्धतीने बरे करण्याचे SynPhNe चे लक्ष्य

मुलुंड येथे राहणा-या ६२ वर्षीय केतन ममानिया यांची तब्येत अगदी उत्तम होती, आणि मधुमेह किंवा हायपरटेन्शन असा कोणताही त्रास त्यांना कधीही जाणवला नव्हता. २०१६ मध्ये धार्मिक सणासुदीच्या काळामध्ये सलग आठ दिवस उपवास व द्रवपदार्थांचे सेवन अशा दिनक्रमाचे पालन करत असताना त्यांना स्ट्रोक अर्थात पक्षाघाताचा झटका आला व त्यांच्या शरीराची उजवी बाजू लुळी पडली. स्ट्रोक आल्यानंतर त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तिथे तीन दिवसांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले.

एप्रिल २०२० मध्ये पक्षाघाताच्या रुग्णांसाठी पारंपरिक उपचारपद्धतीच्या ऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करणारे SynPhNe चे मेड-टेक हे उपकरण त्यांच्या हाती आहे. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना आणि उपचारांमध्ये सततचे अडथळे येत असताना आपल्याला लगेच थेरपीची सेशन्स सुरू करता येतील असा विचारही श्री. ममानिया यांनी केला नव्हता. मात्र SynPhNe कडे त्यांच्या अडचणीवर अगदी नेमका उपाय होता आणि श्री. ममानिया यांच्यासाठी हा सुखद आश्चर्याचा धक्का होता. त्यांना लगेचच न्यूरो फिजियोथेरपीची ऑनलाइन सेशन्स सुरू करता आली. SynPhNe न्यूरोथेरपी तज्ज्ञांना खास त्यांच्यासाठी व्यायामांचा एक विशेष संच तयार केले व केवळ १५ दिवसांच्या आत त्यांना आपल्या हाताच्या हालचालींमध्ये सुधारणा जाणवू लागली.

SynPhNe च्या थेरपी सेशन्समुळे श्री. ममानिया यांना लिहिणे आणि खाणे यांसारखी रोजची कामे करता येणे शक्य होऊ लागले. आधीच्या फिजिओथेरपी सेशन्सचाही ही प्राथमिक कामे करू लागण्याच्या दृष्टीने काही फायदा झाला नव्हता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून दररोज सुरू असलेल्या ऑनलाइन सेशन्समुळे त्यांच्या हातांची काम करण्याची क्षमता व त्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात पूर्ववत झाल्या आहेत.

उपकरणाच्या अवघ्या चार आठवड्यांच्या वापराने मिळालेल्या या स्वातंत्र्याचा व आत्मविश्वासाचा आनंद श्री. ममानिया आता अनुभवत आहेत. ते आता SynPhNe च्या ऑनलाइन थेरपी सेशन्सचा अभिमान बाळगणारे लाभार्थी आहेत.

SynPhNe ची व्हर्च्युअल थेरपी सेशन्स सुरू केल्यापासून श्री. ममानिया यांना पाण्याचा ग्लास उचलणे, कडी लावणे, काढणे, पाण्याच्या बाटलीचे झाकण लावणे आणि उघडणे यांसारखी आपल्याकडून रोजच नकळत होणारी कामे जमू लागली आहेत. 

कोविड-१९ पॅनडेमिकने भारतातील आरोग्यव्यवस्थेमध्ये अडथळे निर्माण केले आहेत. श्री. ममानियांसारख्या स्ट्रोक इत्यादी गंभीर व दुर्धर आजारांमुळे दीर्घकालीन वैद्यकीय देखभालीची आवश्यकता असणा-या रुग्णांवर तर लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम झाला आहे. अशा काळामध्ये, या रुग्णांची गरज समजून घेणे व त्यांना शक्य ते सर्व पाठबळ देऊ करणे महत्त्वाचे आहे. कोविड-१९ मुळे व्यक्तिगत निदान व उपचार मिळण्यावर परिणाम झाला आहे हे खरे आहे, मात्र त्यामुळेच आरोग्यसेवेच्या क्षेत्रामध्ये व्हर्च्युअल थेरपीज व उपचारांना सहाय्यभूत ठरणा-या नवनव्या तंत्रज्ञानांची एक नवी लाट आली आहे. 

आज सोशल डिस्टन्सिंगचे नियम आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत असताना फिजिकल थेरपी घेण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी झाली आहे. अशा काळात स्ट्रोक, मेंदूवर मोठा आघात झाल्याने होणारी दुखापत (ट्रॉमॅटिक ब्रेन इन्ज्युरीज – TBI), पार्किन्सन्स आजार व सदोष आकलनक्षममा (लर्निंग डिसॅबिलिटी –LD) अशा न्यूरोमस्क्युलर अर्थात मज्जासंस्था आणि स्नायूंशी संबंधित आजारांच्या रुग्णांना इच्छा असूनही थेरपी सुरू ठेवणे शक्य नाही. अशावेळी आपल्या ऑनलाइन थेरपी उपक्रमाच्या माध्यमातून रुग्णांना सातत्याने उपचार उपलब्ध होत रहावेत, पूर्ववत होण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रगतीला खीळ बसू न देता या रुग्णांना आपले आजारपण परिणामकारकरित्या हाताळता यावे, याची काळजी घेण्याचे SynPhNe चे लक्ष्य आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये स्ट्रोकपश्चात पूर्ववत होण्याची प्रक्रिया परिणामकारकरित्या हाताळणे व कमी वेळात अपेक्षित परिणाम साधणे देशभरातील लोकांना शक्य व्हावे यादृष्टीने ही ऑनलाइन थेरपी फायदेशीर ठरेल असा SynPhNe चा विश्वास आहे

संबंधित पोस्ट