गणेशोत्सवादिवशीच मोठा कट उधळला, ISISचा दहशतवादी IED स्फोटकांसह ताब्यात

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह साजरा होत असताना मोठं विघ्न टळलं आहे. दिल्लीतील धौलाकुआन रिंग रोड परिसरात एन्काऊंटर सुरू आहे. गणेशोत्सवादिवशी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणा सतर्क होती आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं.


दिल्लीत सकाळीच एन्काऊंटर सुरू झाला आणि या एन्काऊंटरदरम्यान ISISचा एक दहशतवादी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. स्पेशल सेल टीम अद्याप ही कारवाई करत आहे. या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

य़ा दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. हा दहशतवादी दिल्लीत कोणत्या उद्देशाने राहत होता याचा पोलिस तपास करत आहेत. दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी सांगितले की, धौलाकुआन इथे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चकमकीनंतर ISIS च्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे.

अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याच्याकडून २ IED स्फोटकं ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलीस आणि अब्दुल युसूफमध्ये चकमक झाली. ६ वेळा गोळीबार केल्यानंतर युसूफला पकडण्यात पोलिसांना यश मिळालं. हा कोणत्या उद्देशानं आला यासंदर्भात पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. गणेशोत्सवादिवशी मोठं विघ्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळलं आहे.

संबंधित पोस्ट