
जगायची पंचाईत झाली शिक्षणाची फी कुठुन भरायची- पंकज देवकते.
- by Reporter
- Aug 19, 2020
- 1455 views
सोलापूर (भारत कवितके) :सोलापूर जिल्ह्यात आणि शहरात कोरोनाची भयावह अशी परिस्थिती आहे.राज्य शासनाने चालू केलेल्या आनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शाळा महाविद्यालये अतिरिक्त फी आकारुन लुट करत आहेत.राज्य शासनाने परिक्षा रद्दचा निर्णय घेतलेला आहे मग तरीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी फी विद्यार्थ्यांकडुन आकारली आहे. ती फी तात्काळ परत देण्यात यावी.
जिल्ह्यातील शेतकरी,मजुर, कष्टकरी,कामगार यांना सध्याच्या परिस्थितीत जगण्याची भ्रांत झालेली आहे त्यात मग मुलांना शिकवायच की जगायच हा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी यांनी स्वता: लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असं मत रासप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पंकज देवकते यांनी मांडले. रासपने जिल्हाधिकारी यांना कार्यालय सोलापूर येथे लेखी निवेदन दिले. यावेळी रासपचे पंकज देवकते,मा.महेश येडगे मा.सदानंद पांढरे आदि उपस्थित होते.
रिपोर्टर