
दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरातच १२७ वर्षांची परंपरा खंडित
- by Reporter
- Aug 10, 2020
- 587 views
पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १२७ वर्षे चालत आलेली परंपरा यंदा खंडित होणार आहे.
दरवर्षी भव्यदिव्य देखाव्यात श्रीमंत दगडूशेठ गणेशाची मूर्ती बसवली जाते. हा देखावा पाहण्यासाठी व गणपती दर्शनासाठी पुण्यासह महाराष्ट्रातून गणेश भक्तांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने मंदिरातच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाइन दर्शनावर व ऑनलाइन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार आहे.
रिपोर्टर