सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधीच भाजपकडून राष्ट्रवादीला मोठा धक्का

सिंधूदुर्ग: राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन जाहीर केला जाईल,” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती. मात्र त्यापूर्वीच भाजपने राष्ट्रवादीला सहकार क्षेत्रासंबंधित धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याची पुन्हा भाजपावासी झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे , विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे.

जिल्हा बँक निवडणुकीआधीच खासदार नारायण राणे यांनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे. मागील ३५ वर्षे सातत्याने सहकार क्षेत्रात गुलाबराव कार्यरत आहेत आणि सहकार महर्षी कै. शिवरामभाऊ जाधव यांचे निकटवर्तीय म्हणून गुलाबराव यांची आहे ओळख आहे. मालवण येथील राणेंच्या निलरत्न बंगल्यावर त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. गुलाबराव चव्हाण यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० हून अधिक प्रमुख कार्यकर्त्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, अशोक सावंत, वैभववाडी माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण यांची होती प्रमुख उपस्थिती होती.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट