बेचाळीस बाळांना कोरोनामुक्त करत जीवदान देणाऱ्या प्रसिद्ध बालरोगजतज्ज्ञाचे कोरोनानेच निधन..
- by Adarsh Maharashtra
- Aug 06, 2020
- 537 views
रत्नागिरी : कोविड रूग्णालयात सेवा बजावताना ४२ चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे गुरूवारी पहाटे अडीच वाजता जिल्हा कोविड रूग्णालयात मृत्यू झाला. मृत्यू समयी ते ६४ वर्षांचे होते. बाळांना कोरोनामुक्त करत जीवदान देणाऱ्या या प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचे कोरोनानेच निधन झाल्याच्या वृत्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांना धक्का बसला आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ.दिलीप मोरे जिल्हा शासकीय रूग्णालयात त्यांनी बालरोगतज्ञ म्हणून अनेक वर्ष सेवा बजावली. सेवानिवृत्ती नंतरही ते जिल्हा रूग्णालयात सेवा बजावत होते. कोरोनाची साथ पसरताच रत्नागिरीत लहान मुलांनाही कोरोनाची लागण होऊ लागली. जन्मलेल्या चार दिवसांच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली होती. अशा बालकांवर डॉ.दिलीप मोरे जिल्हा रूग्णालयात सेवा बजावत होते. साठी पार केलेली असतानाही ते रूग्णालयात येत होते. लहान मुलांना पहायला कुणी डॉक्टर नसला तर ? हा विचार करून ते सेवा बजावत होते. जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या ४२ बालकांना त्यांनी कोरोनामुक्त केले. ही सेवा बजावत असताना कोरोनाने त्यांना गाठलं. आठ दिवस त्यांच्यावर जिल्हा कोविड रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची कोरोनाशी सुरू असलेली झुंज आज पहाटे अडीच वाजता संपली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम