
मेव्हण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल
- by Reporter
- Aug 03, 2020
- 575 views
पुणे (प्रतिनिधी) : सख्ख्या मेव्हण्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज ढमाले (वय ४०, रा. धनकवडी) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन संजय काकडे (वय ५२) आणि उषा काकडे (वय ४४, दोघेही रा. यशवंत घाडगे नगर, रेंजहिल्स) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज ढमाले हे अनेक वर्षांपासून संजय काकडे यांचे व्यावसायिक भागीदार होते. या भागीदारीतून दोघांमध्ये वाद झाल्याने संजय काकडे यांनी घरी बोलावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे युवराज ढमाले यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरुन संजय काकडे यांच्या विरोधात पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रिपोर्टर