
कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत रुग्णांचा २० हजारांचा टप्पा पार
- by Reporter
- Aug 01, 2020
- 1014 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात ३०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे शनिवारी दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला असून ४१७ कोरोन मुक्त रुग्णना विविध रुग्णालयातून गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शनिवारी आढळून आलेल्या ३०३ कोरोनाबाधित रूग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २० हजार २७० च्या घरात पोहचली आहे. तर यामध्ये ५ हजार ६४५ रुग्ण सध्याच्या स्थितीत विविध रुग्णालयात उपचार घेत असून आतापर्यत १४ हजार २७५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे आतापर्यत ३६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. शनिवारी आढळून आलेल्या ३०३ रुग्णांची विगवतवारी पाहता कल्याण पूर्व - ६९, कल्याण प.- ७८, डोंबिवली पूर्व - ५८, डोंबिवली प. - ६७, मांडा टिटवाळा ७, तर मोहना येथील २४ रूग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, दिवसभरात डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४१७ रुग्ण हे कल्याण-भिवंडी रोडवरील टाटा आमंत्रामधील कोव्हीड केयर सेंटरमधून १५९ तर २० रुग्ण डोंबिवलीतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलमधून, तर बाज आर. आर. रूग्णालयामधून ७ रुग्ण, तसेच ६ रुग्ण हॉलीक्रॉस रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित १४ हजारांच्यावर रुग्ण विविध रूग्णालया मधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झाले आहेत.
रिपोर्टर