कोरोनावर लस तयार करणाऱ्या सिरम संस्थेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वोसर्व शरद पवारांनी अचानक दिली भेट

पुणे (प्रतिनिधी) : जगात कोरोनाचा कहर वाढतच असल्याने सगळ्या जगाचे लक्ष सध्या कोरोनावर लस कधी येणार याकडं आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचा इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत लस विकसित करण्याबाबत करार झाला आहे. या सिरम संस्थेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी अचानक भेट दिली.

शरद पवार सुमारे तासभर सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होते. त्यांनी हडपसर, मांजरी येथील प्लॅन्ट आणि कार्यालय या दोन्ही ठिकाणी भेट घेतली. सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूट आणि इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लशीबाबत झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या भेटीला महत्व आहे.
सिरम भेटीवर शरद पवार यांनी नेमकी काय चर्चा केली. याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र या भेटीवेळी पवार यांच्यासोबत बदामराव पंडित आणि सतीश चव्हाण हे दोघे उपस्थित होते.

कधीपर्यंत उपलब्ध होईल लस?

ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं  पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याने आता आशा पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युचीही या लशीच्या निर्मितीत भागीदारी आहे, त्यामुळे भारतातही ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र या लशीची किंमत असेल, सर्वसामान्यांना ही लस परवडणारी असेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार भारतात उपलब्ध होणाऱ्या ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत ही एक हजार .पेक्षाही कमी असेल. ही किंमत सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखी आहे.

संबंधित पोस्ट