
कल्याणात जिग्नेश ठक्करची गोळ्या झाडून हत्या
- by Reporter
- Aug 01, 2020
- 595 views
डोंबिवली (श्रीराम कांदू) : जिग्नेश ठक्कर उर्फ मुन्ना याची शुक्रवारी (३१ जुलै) रात्री कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जिग्नेश आपल्या कार्यालयातून घरी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जिग्नेश ठक्करचे ठाणे, कल्याण, उल्हासनगर परिसरात मटका आणि पत्त्यांचे क्लब असण्यासह तो क्रिकेट मॅचवरही सट्टा घेत होता अशी प्राथमिक माहिती आहे. शुक्रवारी रात्री कल्याण स्टेशन परिसरातील नीलम गल्लीत आपल्या कार्यालयाबाहेर तो जायला निघताच आधीपासून दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये त्याच्या छातीमध्ये काही गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. यानंतर जिग्नेशला कल्याणच्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचं सांगण्यात आले.
जिग्नेशवर गोळीबार करणारे नेमके कोण होते? आणि हा गोळीबार का करण्यात आला याचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली
रिपोर्टर