नातेवाईकांनी आयसीयुमधील पॉझिटीव्ह रूग्णाचा मृतदेह नेला उचलून

शासकीय रूग्णालयात रविवारी रात्री घडला धक्कादायक प्रकार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्हा शासकीय रूग्णालयात रविवारी राजीवडा येथील एका कोरोना पाॅझिटीव्ह रूग्णाचा आयसीयुमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी आयसीयुमध्ये जावून या पाॅझिटीव्ह रूग्णाचा मृतदेह ताब्यात घेतला यावेळी परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना विरोध केला असता ३० ते ४० जणांचा समूहाने याकडे दुर्लक्ष करत मृतदेह प्रकियेनुसार घेवून न जाता तसाच नेवून अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना रूग्णांवर व्यवस्थित उपचार पणाली केली जात असताना केवळ गैरसमजातून रविवारी रात्री हा पकार घडला. आम्ही नातेवाईकांना खूप समाजावण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याने या समूहासमोर आम्हाला काही करता आले नसल्याची माहिती शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली. या प्रकारानंतर कोरोना योध्दा म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणसमोर मोठा पश्न निर्माण झाला असून प्रशासनाने नातेवाईकांमधील गैरसमज वेळेत दूर करणे आवश्यक असल्याची मागणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.


संबंधित पोस्ट