
मोबाईल गेम खेळत असल्याने आईने मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलाने त्या रागात केली गळफास लावून आत्महत्या!
- by Reporter
- Jul 21, 2020
- 854 views
चेंबूर (बातमीदार) : मुलगा कित्येक तास मोबाईल गेम खेळत असल्याने आईने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला म्हणून मुलाने रागात गळफास लावून आत्महत्या केली.
मोहम्मद अली इमरान खान - वय १२ असे या मयत मुलांचे नांव आहे.
मोहम्मद ता. २० जुलै रोजी दुपारी ठीक. १ वाजण्याच्या सुमारास आपल्या गोवंडी येथील घरात मोबाईलवर गेम खेळत होता.
त्याची आई निलोफर हीने मुलगा कित्येक तास मोबाईल गेम खेळत असल्याने तिला राग आला. तिने त्याला विरोध करीत त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला त्यामुळे त्याला राग आला. त्या रागातून त्याने आपल्या घरातील तिसऱ्या माळ्यावरील बेडरूम मध्ये जाऊन आतून दरवाजा बंद करून बेडरूममधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबाने त्यास उपचार करिता पालीका राजावाडी रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले.
या बाबत मयत मुलगा त्याचे वडील इमरान खान यांचा सविस्तर जबाब नोंद करण्यात आला त्यांनी कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.
रिपोर्टर