राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर दवाखान्यात दाखल , प्रकृतीत सुधारणा

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना प्रकृती अस्वस्थ्येमुळे तातडीने सिंहगड रोड येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाला होता मात्र पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थ वाटल्याने त्यांना रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह अनेक सामान्य कार्यकर्ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे या सातत्यानं हॉस्पिटलमधील प्रशासनाच्या संपर्कात आहेत.राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या म्हणून रुपाली चाकणकर यांना राज्यात ओळखलं जातं. पुणे शहराध्यक्ष पासुन ते महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष पर्यंतचा रुपाली चाकणकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
     
राजकारणापलीकडे एखाद्या कार्यकर्त्यांला किती जपावं याच उत्तम उदाहरण म्हणजे सुप्रियाताई सुळे या आहेत.

चाकणकर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे व खासदार वंदनाताई चव्हाण या सातत्याने रुपाली चाकणकर यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत. हॉस्पिटलमधील प्रशासन,ट्रिटमेंट करणारे डॉक्टर यांच्याशी स्वतः सुप्रिया सुळे वैयक्तिक संपर्कात असुन वेळोवेळी प्रकृतीची माहिती घेतात. राजकारणात असं चित्र दुर्मिळ पहायला मिळतं परंतु राष्ट्रवादीमध्ये कौटुंबिक वातावरण निर्माण करण्याचा सुप्रिया सुळे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. सर्व कार्यकर्ते, नेत्यांच्या सुख दुःखामध्ये त्यांचा वैयक्तिक सहभाग असतो.छगन भुजबळांसारखा नेता कारागृहात असताना स्वतः सुप्रिया सुळे या दर महिन्याला त्यांना भेटायला, तब्येतीची विचारपुस करायला जात असत. रुपाली चाकणकर यांच्या बाबतीतही हेच दातृत्व दिसुन येतं. लवकरच रुपाली चाकणकर सुखरुप बाहेर येतील अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

संबंधित पोस्ट