धक्कादायक : कोरोनाबाधित रुग्णांची पाचव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या.

डोंबिवली (प्रतिनीधी)  : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा कोविड सेंटरच्या पाचव्या मजल्यावरुन एका कोरोना रुग्णाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घडली आहे. आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव प्रशांत कुंडलिक आंबेकर (४०) असे आहे. तो डोंबिवली येथे राहणारा आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

१७ जुलै रोजी प्रशांतची कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आल्यनंतर त त्याला महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याला ९ व्या मजल्यावर रुम देण्यात आली होती.  प्रशांतला   दाखल करण्यात आल्यानंतर तो दार उघड नव्हता. आज डॉक्टरांनी मोठय़ा अथक प्रयत्नांनी त्याला दार उघडण्यास भाग पाडले. प्रशांतच्या या वागण्याने संभ्रमात पडलेल्या डॉक्टर व स्टाफने प्रशांतला खाली घेऊन जाण्याची तयारी केली. ९ व्या मजल्यावरुन खाली येत असताना प्रशांतने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी घेतली. या घटनेची कोन पोलीस तपास करीत आहे

संबंधित पोस्ट