हॉस्पिटलमधून कोरोनाबाधित पळाला आणि फुटपाथवर झोपला,काही वेळाने झाला मृत्यू....

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालया जवळील एका कोरोनाबाधित रुग्णांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.....

डोंबिवली (श्रीराम खंडू) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यात शास्त्रीनगर रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

डोंबिवली पश्चिम शास्त्रीनगर रुग्णालयासमोरील काही स्थानिक रहिवाशांनी हा व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये फुटपाथवर कोरोनाबाधित रुग्ण झोपलेला असल्याचं आढळून आलं. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याबाबत रुग्णालयाला फोन करून माहिती दिली. या रुग्णाला कुठून आला याबद्दल विचारण्याचा प्रयत्नही केला. पण, त्याची बोलण्याचीही स्थिती नव्हती.अखेर तीन तासानंतर या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर या रुग्णाला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. याबद्दल केडीएमसीचे अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला होता. गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. हा रुग्ण कुठे पळून गेला याची माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर स्थानिकांनी हा व्हिडिओ केल्यानंतर या रुग्णाचा पत्ता लागला. या प्रकरणी पोलिसांना सुद्धा माहिती दिल्याचे पानपाटील यांनी सांगितले.याआधीही शास्त्रीनगर रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण पळून जाण्याचे प्रकार घडला होता. 

संबंधित पोस्ट