रत्नसिंधू कलामंच तर्फे आनलाईन वक्त़़ॄत्व स्पर्धेचे आयोजन .....

रत्नागिरी  (प्रतिनिधी) : रत्नसिंधू कोकण विभाग कलामंच. महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय आनलाईन वक्तॄत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा वयोगट १३  ते १८ वर्षे गट क्रं १ व वयोगट १९ ते ३० गट क्रं २ अशा दोन गटात होणार असून स्पर्धेतील गट क्रं १ साठी थोर साहित्यिक अण्णा भाऊ साठे,चला स्वप्नांच्या गावी जाऊ , वाचन एक संस्कार मनांचा,भारत माझा देश आहे,जगाचा पोशिंदा - शेतकरी तर गट क्रं २ साठी सविधानाचे शिल्पकार - डॉ बाबासाहेब आंबेडकर, आजची तरुण पिढी दशा व दिशा,  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माझा देश महासत्ता होणारच,चला माणसे पेरायला लागू इत्यादी विषय आहेत      

स्पर्धेतील सहभागासाठी प्रवेश फी गट क्रं १ साठी १००/रू  व गट क्रं २ साठी ३००/रू आहे दोन्ही गटातील स्पर्धकांनी आपल्या भाषणाचा ७ ते १० मिनिटांचा व्हिडिओ तयार करून  ९४०३६२२००३ किंवा ७८४०९७५०७८ या व्हाटसप मोबाईल वर पाठवावा व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२० राहिल तरीही जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन रत्नसिंधू कोकण  विभाग कलामंचने केले आहे

संबंधित पोस्ट