मुलुंडच्या नगरसेविका व त्यांच्या कुटुंबातील इतर दोन सदस्यांना कोरोणाची लागण

मुलुंड (शेखर चंद्रकांत भोसले) : मुलुंड प्रभाग क्र.१०५ च्या नगरसेविका रजनी केणी, त्यांचे पती नरेश केणी व त्यांचा मुलगा नमित केणी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुलुंडच्या मिठागर कोविड उपचार केंद्रात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नगरसेविका रजनी केणी यांनी आज दूपारी एक व्हाट्सअप मेसेज प्रसिद्ध केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्या स्वतः, त्यांचे पती नरेश केणी व त्यांचा मुलगा नमित केणी यां तिघांच्या कोरोना टेस्टचा अहवाल आला असून हे तिघेही कोविड -१९ पॉसिटीव्ह आले आहेत त्यामुळे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहोत. 

नगरसेविका रजनी केणी यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात पूढे लिहिले आहे की, 'आमच्या संपर्कात जे कोणी आले असतील त्यांनी स्वतः होम क्वारंटाईन व्हावे. तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करून घ्यावी. तसेच प्रभागातील कोणत्याही नागरी व इतर समस्या असतील तर कुणाल केणी किंवा राहुल अष्टेकर यांच्याशी संपर्क साधावा.' 

रजनी केणी या गेल्या साडेतीन महिन्यांपासूनच्या कोरोना काळात सतत सामाजिक कार्यात व्यस्त आहेत त्यामुळेच गोरगरिबांना मदत करताना त्यांचा संपर्क एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाशी आला असावा व त्यातच कोरोनाची लागण झाली असावी, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट