ठाकरे सरकार आर्थिक संकटात,कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागेल-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
- by Adarsh Maharashtra
- Jul 02, 2020
- 480 views
पुणे, २ जुलै :-कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी राज्याच्या सद्यआर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. यावेळी महसूलात घट झाल्याने पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांनां वेतन देण्यासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता वर्तवली.तसेच आरोग्य, मदत व पुनवर्सन यांसह दोन विभाग वगळता इतर विभागात पगार कपात करण्याची शक्यताही यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. तसेच डॉक्टर, नर्स व त्यांच्याशी संबंधित कोरोना योद्धांचे पगार दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
करोना विषाणूमुळे राज्यातील उद्योग व्यवसाय चालणे कठीण झाले आहे. यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली असताना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमधील एकही पैसा अद्याप राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या गंभीर परिस्थितीत केंद्राने राज्याला लवकरात लवकर मदत देणं अपेक्षित आहे. मात्र, असं होताना दिसत नाही असं ते म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम