कर्जत तालुक्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या पन्नास! कर्जतमध्ये घबराहाट; नेरळमधे आरोपीला कोरोना!

नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा संख्येत वाढ होत आहे. काल कर्जत तालुक्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या ५०  झाल्याने प्रंचड खळबळ माजली आहे. तर नेरळ पोलिसांनी एका गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांसह संपुर्ण नेरळ शहरात घबराहाटीचे वातावरण पसरले आहे. 

रायगडसंह कर्जत तालुक्यांत लाॅक डाऊन पाळल्यानंतर तालुक्यांत सुरुवातीचा कालात कोरोनाचे रुग्ण बोटावर मोजण्यात येतील ईतकेही नव्हते, मात्र लाॅक डाऊन शिथिल झाल्यानंतर कर्जत तालुक्यांतील अनेकांचा बाहेर व बाहेरील लोकांचा कर्जत तालुक्यांशी संपर्क आल्याने कर्जत तालुक्यांतील विविध शहरासंह आता काही खेडेगावांतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, येथे ५ जणांचा म्रुत्यु झाला असल्याने म्रुत्युचे प्रमाण १० टक्के असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाचा सुचनांचे काटेकोर पालन आणखीन काही दिवस करावे असे मत अनेकांचे आहे.
विशेष म्हणजे कर्जत तालुक्यांतील कोरोनाची लागण झालेल्या २६ जणांना रुग्णालयातून बरे झाल्याने सुट्टी मिळाली आहे, तर १९ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे येथे कोरोनाग्रस्तांची बरी होण्याची टक्केवारी प्रमाण ५० टक्क्यांवर आहे. कर्जत तालुक्यांत लाॅक डाऊन शिथिल झाल्याने प्रंचड वावर जनतेचा बाजार व अनय ठिकाणी आहे. त्यामुळे कोणतीही खबरदारी कारी नागरीक घेत नसल्याने पुढील कालात हा कोरडा कर्जत तालुक्यांत प्रंचड वाढणार असल्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच कर्जत पोलिस ठाणे मधील एका पोलिसाला कोरोना झाल्यानंतर नेरळ पोलिस ठाणेतील एक आरोपी कोरोनाग्रस्त आढलल्याने नेरळ पोलिसही चिंतेत सापडले आहेत. तसेच या आरोपींचा गुन्ह्यांत तपास कानी पंचनामा व अन्य गोष्टींसाठी नेरळ ग्रामपंचायतीचेही दोन कर्मचारी घेण्यात आल्याने यांचा प्रत्यक्ष संपर्क या आरोपीशी आला नसल्याचे समजत असले तरीही येथेही भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या कर्जत पेक्षा नेरळ परीसरात कोरोना अधिक वाढत असल्साने येथिल सर्व पक्षीयांनी व व्यापारी वर्गाने तीन दिवस नेरळ काही काल बंद ठेवले होते. त्यामुळे नेरळ शहरात गर्दी करु नये असे आवाहन नेरळ ग्रामपंचायत व व्यापाऱ्यांनी नागरीकांना केले आहे.
दरम्यान रायगड जिल्ह्यातील कर्जत
तालुक्यांत कोरोना वाढणे हे मोठे आवाहन असल्याने नेरळ आणि कर्जत शहरात पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच नेरळ परीसरात व कर्जतचा काही अन्य भागातुन बाहेरुन पर्यटक मंडळीही येत असल्याचे समोर आल्याने येथे कडक उपोययोजना करण्यात येणेची गरज असल्साचे बोललं जात आहे. कर्जत तालुक्यांत ५० च्या वर कोरोना रुग्ण सापडल्याने आता कर्जत तालुका डेंजर झोन मध्ये असल्साची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट